Tuesday, April 12, 2011

//Dil Se Desi// तू जाताना


तू जाताना बघत होतो मी पाठमोरी तुला
आणि तू नजरेआड झालीस तेव्हा तुझ्या पाऊलखुणांना..
रेतीमध्ये उमटत "जाणारी" तुझी प्रत्येक पाऊलखुण
मनामध्ये एक जखम करून जात होती.. आयुष्यभर कुरवाळण्यासाठी

अताशा जात नाही मी त्या समुद्रकिनार्यावर
तुझ्या त्या मिटलेल्या पाउलखुणा शोधायला
तुला अन मला आपलं मानणार्या,
त्याच समुद्राच्या लाटांनी, तुझ्या तिथल्या आठवणी पुसल्या असतील अता..
हो पुसल्याच असतील...या लाटाही जगासारख्याच वागतात..

आणि कशाला शोधू मी तुझ्या पाउलखुणा?
तुझी प्रत्येक आठवण...
प्रत्येक शब्द तुझा या मनावर कोरलेला आहे.. अजुनही,
मग पाऊलखुणांची काय गरज मला?

कधी आलीस तर बघून जा,
तू.... तुझ्या आठवणी... तुझं प्रेम...
अजुनही जपून ठेवलंय मी जसंच्या तसं
डायरीच्या प्रत्येक पानात, प्रत्येक शब्दात.
हो.. मला मात्र विसरलोय पुरता
तसा शोधतही नाही मी मला.








आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
st_patricks_day_animated_gif_1.gif
आम्हाला पण जगू द्या....
सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्‍याला विटते,
आणि तेव्‍हां कुठे त्‍याला,
मृगजळ भेटते.........
प्रशांत पवार
मला फेसबुक वर भेटा
कृपया गरज नसल्यास ई-मेल प्रिंट करू नका.


No comments:

Post a Comment