Tuesday, May 31, 2011

//Dil Se Desi// शोध देवाचा...

तू येतोस का रे माझ्याबरोबर देव शोधायला?...

नक्की हा प्रकार आहे तरी काय?


उत्सुकता माझ्यासारखी असेलच तूला म्हणून विचारतोय...

गल्लोगल्ली, चौकात, मंदिरात आम्ही दोघे दिवसरात्र फिरलो...

नवसाला पावणारा, लोकांच्या मनातले जाणणारा सर्वांना भेटलो...

तरीही तो सापडत कसा नाही याचे आश्यर्य वाटले...

शोध घेताना जवळपासचे सारे काही संपले...

तरी शोध त्याचा अखंड चालूच ठेवला...
 
थकलो खूप... भुकेने व्याकुळ झालो...

फिरता फिरता एका झोपडीचा आसरा घेतला विश्रांतीला...

म्हाताऱ्यान झोपडीतल्या लगबगीने विचारल...

खूप थकलासा... थोडी चटणी भाकर खावून घ्या... बरं वाटल...

अर्ध्याच भाकरीत पोट गच्च भरलं कस हे तो देवच जाणे...

आम्हाला भाकरी देणारा म्हातारा स्वत: उपाशी पोटी

स्मित हास्य करत आमच्याकडे पाहत होता...

देव फिरत शोधणं व्यर्थ होत...

तो कुठेही कोणत्याही रुपात गवसतो...

कधी आणि कुणातही सापडतो...

हे त्या म्हाताऱ्याला भेटल्यानंतर प्रकर्षाने जाणवलं...

तो आपल्या आत आहे... प्रत्येकात आहे हे नव्याने उमगले....

आणि त्याच्या ह्या लीलेला साष्टांग नमस्कार केला...
 
Only रुपेश






आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
BIRD_WATER00.GIF
आम्हाला पण जगू द्या....
तुमच्या घराच्या छतावर, खिडकीवर किमान एक तरी पेला पाणी भरून ठेवा..

सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्‍याला विटते,
आणि तेव्‍हां कुठे त्‍याला,
मृगजळ भेटते.........
प्रशांत पवार
मला फेसबुक वर भेटा
कृपया गरज नसल्यास ई-मेल प्रिंट करू नका.




No comments:

Post a Comment